top of page

अवघड वजराई धबधबा उतरण्याचा उपक्रम - उंची ८२४ फूट

वजराई धबधबा, कास पठार, सातारा.


पुण्यापासुन १३० कि. मि. अंतरावर व सातारा पासुन २७ कि.मि.वर कास पठार येथे जग प्रसिद्ध फुलांच्या सामराज्यात गडद हिरवळीत आहे. संपुर्ण महाराष्ट्रातील उंच धबधब्यां पैकी एक ज्याची उंची २५४ मिटर म्हणजेच ८२४ फुट अाहे. भोवती निसर्ग रम्य वातावरणाचा जणू खजिनाच अाहे. पावसाळ्यांत या ठिकाणी जगभरातुन पर्यटक येत असतात. त्यामुळे भांबवली गावाला व्यवसायाची गुरुकिल्लीच मिळाली अाहे. मात्र पावसाळ्यात पाण्याचा प्रवाह प्रचंड जोरात असल्या मुळे धबधबा दुरुनच पाहावा लागातो. या ठिकाणी अनेक वन्य प्राणीहि अाढळुन येतात.अायुष्यात एकदा तरी पाहावे असे निसर्गरम्य ठिकाण भांबवली एक एेतिहासिक व सामंप्रदाईक गाव अाहे.

येथील संस्क्रृती सांगाते मराठी संत श्री समर्थ रामदास स्वामी यांनी अगदी तिनच पावलात म्हणजेच तिन स्टेप मध्ये हा धबधबा चढुन पुर्ण केला व त्या वेळी पासुन त्याची विलिनता 3 Stair Waterfall Mountains मध्ये झाली. हि माहीती(आख्यायिका) गावच्या जुण्या जेष्ठ लोकांकडुन समजते. त्याचप्रमाणे या ठिकाणी अनेक पौराणिक मंदिरे अाढळून अाली.


दोन वर्षांपासून हा वजराई धबधबा दोराच्या सहाय्याने उतरण्याचे स्वप्न आम्ही दुर्गप्रेमी उराशी बाळगून होतो.प्रत्येक वेळेस पाहणीत तेथील कड्याला आगी मधमाश्यांची पोळी लटकलेली निदर्शनास यायची व आम्हाला आमचा बेत पुढे ढकलावा लागत होता. खुप दिवसांच्या प्रतिक्षे नंतर भयानक परिश्रम घेऊन, २ ते ३ वेळा प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन, दुर्बीणीतून बारकाईने पाहणी केल्यानंतर उतरण्याच्या मार्गात कोठेही मधमाश्यांची पोळी नसल्याचे आढळून आले.लगेच २० व २१ जानेवारी रोजी अाम्ही सर्व दुर्गप्रेमी गिरिभ्रमन संस्थेच्या सभासदांनी वजराई धबधबा उतरण्याची माहीम आखली.सदर माहिमेचे नेतृत्व उत्कृष्ठ व अनुभवी गिर्यारोहक श्री.धनराज पिसाळ यांनी करण्याचे निश्चित झाले. दिनांक २० जानेवारी रोजी दुपारी १.३० वा आम्ही कास गावात पोहचलो. सर्व साहित्याची जमवा जमाव झाल्यानंतर संघनायकांनी रॅपलिंग करण्यासाठी स्टेशन फिक्स केले.


पहिला टप्पा अतिशय थरारक ३८० फुटाचा होता. मोजकेच २० फुटापर्यंत खडक होता व नंतर पुर्ण अोहरहँग. दुसरा टप्पा २६० फुटाचा व तिसरा टप्पा १८४ फुटाचा होता. तीनही टप्पे पूर्ण ओवरहँग आहेत. पहिल्या दिवशी रोप फिक्स झाल्यानंतर खर्या अर्थाने रँपलींगला सुरुवात झाली.. पहिला संघनायकाने श्रीगणेशा केला. पहिल्या दिवशी ५ दुर्गप्रेमींनी दुसर्या टप्प्यापर्यंत आगेकुच केली, अंधार पडल्यामुळे पहिल्या दिवशी आम्ही दुसर्या टप्प्याचा रोप तसाच ठेउन जवळ जवळ ४५ मि. चालुन भांबवली गावाकडे रवाना झालो.

दुसर्या दिवशी खरी कसोटी लागणार होती कारण काही नवख्यांचा समावेश होता. पुण्याहुन काही जण तर साताऱ्या हुन काही दुर्गप्रेमी येणार होते. असा ऐकुन २४ जणांचा ताफा घेऊन पुर्ण तयारी निशी पुन्हा धबधब्या कडे रवाना झालो, संघनायकांनी संपुर्ण साहित्याची माहिती देत सर्व नियमांची कानउघाडनी केली व पुढील कार्यास परवानगी दिली. सर्व साहित्यांची जुळवा जळव झाल्यानंतर खर्या अर्थाने थराराला सुरुवात झाली, एक एक करुण ८ लोकांनी पहिला टप्पा सर केला , दुसर्या टप्प्यावरही जबाबदार संघनायकांनी भार संभाळला व एक एक करुन सर्वांना तिसऱ्या टप्प्यावर उतरवले.. पुन्हा तिसऱ्या टप्प्यावर जबाबदार संघनायकांनी भार संभाळला व एक एक करुन सर्वांना खाली पोहचवले.


असे करुन एकूण २४ पैकी २२ दुर्गप्रेमींनी सुखरूपपणे यशस्वी रॅपल करुन यश संपादन केले.सर्वानी पुन्हा ४५ मि. चढाई करुन भांबवली गाव गाठले. यात प्रामुख्याने खास वैशिष्ट्य सांगायचे झालेतर सर्वात लहान दहा वर्षाच्या नू.म.वी प्रशालेत इ.५ शिकणाऱ्या कु.पार्थ संतोष माने याचाहि समावेश होता. त्यानेहि यशस्वीपणे धबधबा उतरून मोहीम पूर्ण केली.सर्व संघनायकांनी चोख जबाबदारी बजावत यश संपादन करण्यास मदत केली. काही मंडळी समोरच्या टेहळणी ठिकाणावर संपुर्ण दिवस बसून कॅमेरा व दुर्बीणीच्या सहाय्याने संपुर्ण प्रयोगाचे टिपन व योग्य मार्गदर्शन केले. प्रत्येकाने आपली जबाबदारी चोख निभावत यश संपादन करण्यास मदत केली.


सहभाग - सुनिल पिसाळ, धनराज पिसाळ,गणेश पिसाळ, धनंजय सपकाळ,गणेश पठारे, रमेश वैद्य, विश्वजीत पिसाळ, सदगुरु काटकर, रवींद्र गायकवाड , दिनेश सुंटले, विशाल फरांदे, संदिप जाधव, अमोल पिसाळ, सचिन निगडे , प्रकाश मोरे, संतोष माने, *कु.पार्थ माने(वय १०वर्ष)*, रोहित मोटवानी, विजय पिसाळ, संदीप गायकवाड, अमृत देशमुख, विशाल पिसाळ, संदीप गुरव, हर्षद पिसाळ.



Featured Posts
Recent Posts
Archive
Search By Tags
Follow Us
  • Facebook Basic Square
  • Google+ Basic Square
bottom of page