top of page
Search

रतनगड - २०१५ (Ratangad)

  • Sameer Hajare
  • Dec 16, 2015
  • 2 min read

प्रकार - : गिरीदुर्ग

उंची - : १२९७ मी. (समुद्रसपाटीपासून)

पायथ्याचे गाव - : रतनवाडी

मार्ग - : पुणे - संगमनेर - अकोले - शेंडी - रतनवाडी

प्रवेश मार्ग - : १) रतनवाडी दरवाजा (गणेश दरवाजा) शिडीची वाट

२) साम्रद दरवाजा (त्रंबक दरवाजा) १५५ खोदीव पायऱ्या

३) कोकण दरवाजा

नाशिक व नगर जिल्ह्याच्या सीमेवर एक डोंगररांग पसरली आहे. त्याच डोंगर-रांगेत महाराष्ट्राचे एव्हरेस्ट म्हणजे शैल कळसुबाई वसलेले आहे. तिच्या सभोवताली तेवढेच रुबाबदार व तोलामोलाचे मानकरी आहेत. त्यातलाच हा एक "रतनगड". एकीकडे घनदाट जंगल तर दुसरीकडे भंडारदऱ्याचा प्रचंड असा जलाशय यामध्ये रतनवाडी हे गाव आहे. या रतनवाडीत साधारणतः १२०० वर्षापूर्वीचे हेमाडपंथी अमृतेश्वराचे यादवकालीन सुंदर व विलोभनीय असे मंदिर आहे. मंदिराच्या जवळच सुंदर बांधलेली पुष्करणी आहे.

मंदिर पाहून बाहेर पडलो की रतनवाडीच्या पश्चिमेस आपल्याला रतनगड दिसतो त्याच्या उजवीकडील बाजूस असणार रतनचा खुट्टामुळे (सुळका) त्याची ओळख पटते. आपण रतनगडाच्या दिशेने कूच करतो. रतनवाडी सोडल्यानंतर अंदाजे २० ते २५ मिनिटे चालल्यावर आपण गडाखालील दुसऱ्या पठारावर येऊन पहचतो. तिथेच साम्रद-कुमशेत-पाचनई-हरिश्चंद्र हा मार्ग जुना आपल्याला भेटतो.

ती वाट सोडून गडाच्या दिशेने थोडी चढाई करून वर गेल्यावर आपण कातळाला लावलेल्या शिडीजवळ येऊन पोहचतो. शिडी चढून वर गेल्यावर गडाचा पहिला गणेश दरवाजा लागतो. दरवाजातून आत गेल्यावर उजवीकडची वाट तीन गुहांच्या समूहाकडे घेऊन जाते,(गुहेमध्ये राहण्याची सोय होऊ शकते) तर डावीकडची वाट गडाच्या दुसर्‍या दरवाजाकडे जाते, दुसर्‍या दरवाजातून पुढे गेल्यावर आपल्याला पडक्याअवस्थेतील गोल बुरुज दिसतो. त्याच्याच जवळ पाण्याचे दोन ते तीन टाके आहेत. किल्ल्याच्या पश्चिमेस माहुली व पाबरगड तर दक्षिणेस कात्राबाई, आजोबा व घनचक्कर यांचे दर्शन होते

तिथून पुढे पश्चिम बाजूच्या पायवाटेने ८ ते १० मिनिट चालल्याने नंतर आपण कोकण दरवाज्याजवळ येऊन पोहचतो. दरवाजा भग्नावस्थेत असून हि वाट अत्यंत कठीण व धोकादायक आहे. इथूनच प्रथम बाण (Baan Pinnacle) सुळक्याचे दर्शन होते.(सह्याद्रीतील सर्वात उंच व प्रस्तरारोहणासाठी अत्यंत कठीण सुळका मनाला जातो) तिथून पुढे गेल्यावर २ ते ३ पाण्याचे टाके लागतात.

याच वाटेवर पुढे चालत जाताना आर्वजून पाहावे असे ठिकाण लागते ते म्हणजे निसर्गनिर्मित नेढे. नेढ्यातून किल्ल्याच्या चहुबाजुचा परिसर निहाळता येतो. उत्तरेस अलंग, मदन, कुलंग, कळसूबाई शिखर, किरडा, खुट्टा, पट्टा उर्फ विश्रामगड, साम्रद, सांधणदारी व भंडारदरा जलाशय असा परिसर दिसतो. नेढ्यातून पलीकडे उतरून आपण कातळात कोरलेल्या पायऱ्याजवळ येतो. पायऱ्या उतरून आपण संपूर्ण कातळात कोरलेल्या त्र्यंबक दरवाज्याजवळ येतो. या वाटेने थोडे पुढे गेल्यावर समोर रतनच्या खुट्ट्याचे दर्शन होते. हि वाट सोपी असून रतनगड व खुट्ट्यामधून जाते.

भटकंतीतील सहभागी सभासद : समीर हजारे, राजेंद्र चव्हाण, सचिन निगडे, सुयश लोयरे, अमोल मांगडे.

Commenti


Featured Posts
Recent Posts
Archive
Search By Tags
Follow Us
  • Facebook Basic Square
  • Google+ Basic Square

© 2015-2020 Durgpremi. All Rights Reserved.                                                                                                                                           Designed and Maintained by Sameer Hajare

bottom of page