top of page

वृक्ष लागवड घेरा सिंहगड - २०१६ (Sinhgad)

महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीने वन महोत्सवानिमित्त राज्यभरात एक जुलै या एकाच दिवशी दोन कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला. या कार्यक्रमांतर्गत पुणे जिल्ह्यात 16 लाख 27 हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. राज्य शासनाने वन महोत्सवाचे आयोजन केले. या उपक्रमात नागरिक, विद्यार्थी, अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि विविध सामाजिक संस्थांना या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले होते.

याच आवाहनाला साद म्हणून दुर्गप्रेमी गिरिभ्रमण संस्थेनं खारीचा वाटा उचलला आहे. वन विभाग पुणे व वन संरक्षण समिती घेरा सिंहगड यांच्या विद्यमानाने दुर्गप्रेमीच्या ४० सभासदाच्या चमूने सिंहगड येथील तळई उद्यान व पाबे घाटात वन विभागा सोबत मिळून वृक्षारोपण केले. तसेच नागरिक, विद्यार्थी, सिंहगड रोड डॉक्टर्स असोशिअन, शंभर B S F जवान व इतर संस्थानी यात सहभाग नोंदवला. एक जुलै दुपारी सूमारे ३ वाजेपर्यँत सुमारे 16000 वृक्षांची लागवड झाली होती.‪

#‎वृक्षलागवडसिंहगड - 2016‬

दुर्गप्रेमी गिरिभ्रमण संस्था

Featured Posts
Recent Posts
Archive
Search By Tags
Follow Us
  • Facebook Basic Square
  • Google+ Basic Square
bottom of page